अहमदनगर । नगर सह्याद्री माजी नगरसेवक संजय झिंजे यांना मंगळवारी दुपारी टीळक रस्त्यावर मारहाण झाली. या संदर्भात त्यांनी सूरज जाधव याच्या वि...
अहमदनगर । नगर सह्याद्री
माजी नगरसेवक संजय झिंजे यांना मंगळवारी दुपारी टीळक रस्त्यावर मारहाण झाली. या संदर्भात त्यांनी सूरज जाधव याच्या विरूद्ध तक्रार करण्यासाठी कोतवाली पोलीस ठाणे गाठले. विशेष म्हणजे आ. संग्राम जगताप यांच्यासमोर ही मारहाण झाल्याचे झिंजे यांनी सांगितले.
झिंजे मंगळवारी टीळक रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयात एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे फोटोसेशन सुरू असतान त्यांना सूरज जाधव यांनी धक्का दिला. यावेळी त्यांनी विचारणा केली. तसेच तेथे उपस्थित असलेले आ. जगताप यांनी संबंधिताला शांत बसण्याचे सांगितले. मात्र जाधव याने तेथेच आपल्याला शिविगाळ करत ‘बाहेर ये, मग दाखवतो’ अशी धमकी दिल्याचे झिंजे यांनी सांगितले. तसेच बाहेर आल्यानंतर एकदम दहा ते बारा जणांनी आपल्याला मारहाण सुरू केली. यावेळी आ. जगताप तेथे उपस्थित होते, त्यांनी ‘सोडा सोडा’ असे मारहाण करणार्यांना सांगितल्याचे झिंजे म्हणाले.
या घटनेनंतर मी सरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलो. संबंधित कार्यकर्ते आ. जगताप यांचे कार्यकर्ते असून, सूरज जाधव याच्या विरोधात आपण यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत, असेही झिंजे यांनी सांगितले.
COMMENTS