राहुरी । नगर सह्याद्री राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेथे जिल्हा परिषद शाळेतील एका मद्य...
राहुरी । नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेथे जिल्हा परिषद शाळेतील एका मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवीच्या वर्गात शिकणार्या अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.
राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोपी मदन दिवे या विकृत व मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवीच्या वर्गात शिकणार्या तीन अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेबाबत सदर मुलींनी त्यांच्या घरातील लोकांना शिक्षक करत असलेल्या विकृत चाळ्यांची माहिती दिली. मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला.
पोलिसांनी ताबडतोब त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी मदन रंगनाथ दिवे, राहणार दाढ बुद्रुक, तालुका राहता. यांच्या विरोधात कलम 354 (अ) पोस्को 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.
COMMENTS