अहमदनगर । नगर सह्याद्री हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. याबाबत मुस्लिम समाजाच्यावतीने शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना निवेदन दिले आहे.
बुधवारी नगर शहरातून सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा संपल्यानंतर मुस्लिम समाज पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाला होता. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोर्चादरम्यान शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांनी मुस्लिम समाजाला शिवीगाळ केली व अपशब्द वापरले. यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या कारणावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी.
अजून कोणीही या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाविरूद्ध काही अपशब्द अथवा शिवीगाळ केली असेल तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर नगर मुस्लिम समाजाव्दारे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान यासंदर्भात उपअधीक्षक कातकाडे यांनी दखल घेत कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले.
COMMENTS