तोफखाना परिसरातील नागरिकांची मागणी अहमदनगर । नगर सह्याद्री शासनाच्या दहा कोटींच्या निधीमधून प्रस्तावित केलेली कामे सुरू करण्याबाबत सार्वजनि...
तोफखाना परिसरातील नागरिकांची मागणी
अहमदनगर । नगर सह्याद्री
शासनाच्या दहा कोटींच्या निधीमधून प्रस्तावित केलेली कामे सुरू करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील वर्षी ठेकेदाराला पत्र दिले होते. स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ठेकेदाराने काम केले नसल्यामुळे ठेकेदार संस्था ए. सी. कोठारी यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी ऋषिकेश गुंडला यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहराच्या मध्यवर्ती परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तोफखाना परिसरातील अनेक कामे शासनाने मंजूर केलेल्या दहा कोटींच्या निधीमधून प्रस्तावित आहेत. ठेकेदाराकडून वारंवार कामे करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पवार यांनी मागील वर्षी ठेकेदार संस्थेला तात्काळ काम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही ठेकेदाराने काम केले नाही. त्यामुळे ठेकेदार संस्थेच्या मागील दहा वर्षातील सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेतील कामाबाबत सर्वे करून ठेकेदार रसिकलाल कोठारी व त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने असलेल्या इतर ठेकेदार संस्थांना काळ्या यादीत टाकावे. ठेकेदारावर गुन्हा दाखल करून अनामत रक्कम जप्त करावी. नवीन ठेकेदाराला काम देऊन प्रलंबित काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी तोफखाना परिसरातील ऋषिकेश गुंडला व नागरिकांनी केली आहे.
COMMENTS