अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेज टू आणि अमृत योजनेतील कामांबाबत खा. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी महापालिक...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फेज टू आणि अमृत योजनेतील कामांबाबत खा. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी महापालिकेत बैठक घेतली. यावेळी शहरातील इतर प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली.
शहराशी निगडित आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पाणी योजना फेज २ व भुयारी गटार योजना यातील अडचणी यावेळी जाणून घेऊन त्यासंबंधी सूचना केल्या. या दोन्ही योजनांसाठी केंद्र सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळालेला आहे.
हे प्रकल्प जलगतीने होण्यासंदर्भात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आयुक्त पंकज जावळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर अध्यक्ष महेंद्र गंधे, सतीश शिंदे, सचिन जाधव, दिलीप सातपुते, अजय चितळे, संजय ढोणे, निखिल वारे यांच्यासह पदाधिकारी, प्रकल्पाशी निगडित अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS