अहमदनगर । नगर सह्याद्री लग्नात ठरलेले हुंड्याचे राहिलेले एक लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी स...
अहमदनगर । नगर सह्याद्री
लग्नात ठरलेले हुंड्याचे राहिलेले एक लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्या प्रकरणी सावेडी उपनगरात माहेरी राहत असलेल्या विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पती, सासू-सासरे व नणंद अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती स्वप्नील दत्तात्रय जोशी, सासरा दत्तात्रय बाबुराव जोशी, सासू प्रज्ञा दत्तात्रय जोशी (सर्व रा. पंढरपुरनगर, हिंगोली) व नणंद पूजा श्रीराम शाखाई (रा. हैद्राबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडितेचे स्वप्नील जोशी याच्याशी 10 मे 2022 रोजी हिंगोली येथे विवाह झाला होता.
पीडितेच्या वडिलांनी लग्नात साडेचार तोळे सोन्याचे दागिने व एक लाख रूपये हुंडा दिला होता. आणखी एक लाख देण्याचे ठरले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांत सासरच्यांनी हुंड्याचे राहिलेले एक लाख रूपये माहेरहून आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यास सुरूवात केली. तसेच पती स्वप्नील दारू पिऊन मारहाण करत होता. 22 ऑगस्टला पीडितेचे सर्व दागिने काढून माहेरहून हुंडा आणण्यासाठी घरातून काढून दिले. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS