अहमदनगर / नगर सह्याद्री न्याय प्रविष्ठ बंगल्यासमोर बांधकाम केल्याचा जाब विचारणार्या पती-पत्नीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग केल्याची घटन...
अहमदनगर / नगर सह्याद्री
न्याय प्रविष्ठ बंगल्यासमोर बांधकाम केल्याचा जाब विचारणार्या पती-पत्नीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली. पीडितेच्या फिर्यादीवरून गजानन अरविंद भांडवलकर व त्याचा भाऊ (नाव माहिती नाही, दोघे रा. सोलापूर रोड, दरेवाडी ता. नगर) यांच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा त्यांच्या दिरासोबत बंगल्याच्या संपत्तीवरून न्यायालयात वाद सुरू आहे. फिर्यादी व त्यांचे पती बुधवारी सकाळी वाद सुरू असलेल्या बंगल्याकडे गेले होते. त्यांना तेथे बांधकाम सुरू असल्याचे दिसले. त्यांनी पाहणी केली असता त्यांच्या दिराच्या ओळखीचे गजानन भांडवलकर व त्याचा भाऊ तेथे होते.
फिर्यादी व त्यांच्या पतीने त्यांना येथे काय करता, अशी विचारणा केली. भांडवलकर यांना त्याचा राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असताना गजानन याने मोबाईल हिसकावून हात धरला. त्यांच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. भांडवलकर यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS