अहमदनगर / नगर सह्याद्री - घर खाली करण्यासाठी महिलेचा विनयभंग करून दीराला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी नगरमध्ये घडली. पीडित महिलेने तो...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
घर खाली करण्यासाठी महिलेचा विनयभंग करून दीराला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी नगरमध्ये घडली. पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू जग्गी (पुर्ण नाव माहिती नाही, रा. सिव्हिल हाडको), दोन अनोळखी पुरूष व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीने विकत घेतलेल्या घराचे रिन्युएशेनचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी तेथे फिर्यादीसह त्यांची जाऊ, सासू घरात असताना राजू जग्गी याने इतर दोन पुरूष व एक महिलेसह घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने त्यांना अडवल्याने त्यांनी शिवीगाळ करत राजू जग्गी याने त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले. जग्गी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीच्या दिराला मारहाण करत, हे घर माझे आहे, तुम्ही ते लवकर खाली करा नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना जीवे मारून टाकील अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS