अहमदनगर | नगर सह्याद्री जावायाने सासूला शिवीगाळ, मारहाण करत हाताला चावा घेतल्याची घटना रविवारी दुपारी कवडेनगर येथे घडली. या प्रकरणी मनिषा कै...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जावायाने सासूला शिवीगाळ, मारहाण करत हाताला चावा घेतल्याची घटना रविवारी दुपारी कवडेनगर येथे घडली. या प्रकरणी मनिषा कैलास पवार (वय ४० रा. रोकडे गल्ली, पिराचे मागे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जावई गणेश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी दुपारी मनिषा पवार या मुलगी दिव्या व जावई गणेश यांच्याकडे कवडेनगर येथे असताना ते घरातील सामान घेऊन दुसर्या ठिकाणी राहण्यास जात असताना मनिषा यांनी त्यांना, लोकांचे पैसे देऊन जाफ, असे म्हटले. याचा जावई गणेश यांना राग आल्याने त्यांनी सासू मनिषा यांना शिवीगाळ, दमदाटी केली.
सासू त्यांना समजून सांगण्यास गेली असता जावई गणेशने सासू मनिषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डाव्या हाताच्या पंजाला चावा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनिषा यांच्या फिर्यादीवरून जावई गणेश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS