अहमदनगर । नगर सह्याद्री राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्यावर सरंजामी पद्धतीने विरोधकांनी जो भ्याड हल्ला केला, त्याचा नग...
अहमदनगर । नगर सह्याद्री
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांच्यावर सरंजामी पद्धतीने विरोधकांनी जो भ्याड हल्ला केला, त्याचा नगर शहर भाजपच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. राज्य सरकारचे सर्व मंत्री जनतेसाठी काम करत आहे. शिंदे फडणवीस सरकार राज्याची करत असलेली प्रगती विरोधकांना पहावत नसल्याने विरोधक मंत्र्यांची बदनामी करत आहेत. मात्र आम्ही ही बदनामी सहन करणार नाही. पुन्हा असे भ्याड हल्ले विरोधकांनी केले तर शहर भाजपा त्यास जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी दिला.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांनी पुण्यात शाई फेकल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या वतीने लक्ष्मिकारंजा येथील पक्ष कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. गंधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निषेधाचे फलक झळकवत घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गुंडशाही व झुंडशाही विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सरचिटणीस तुषार पोटे व महेश नामदे, संगीता खरमाळे, प्रिया जानवे, रेखा विधाते, ज्योती दांडगे, बाळासाहेब गायकवाड, पंकज जहागीरदार, अजय चितळे, सुवेंद्र गांधी, महेश तवले, संतोष गांधी,
बाबासाहेब सानप, अनिल गट्टाणी, अमोल निस्ताने, बाळासाहेब भुजबळ, अविनाश साखला, नरेंद्र कुलकर्णी, रवींद्र बारस्कर, सुमित बटोळे, महावीर कांकरिया, कुंडलिक गदादे, चंद्रकांत पाटोळे, राजू मंगलारप, मिलिंद भालसिंग, चिन्मय पंडित, रियाज कुरेशी, प्रद्युम्न जोशी, अभिषेक दयामा, नरेश चव्हाण, शरद बारस्कर आदी उपस्थित होते.
COMMENTS