खा. सुजय विखे पाटील यांची माहिती ः मार्चमध्ये निविदा निघणार अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर शहरात भूमिगत विद्युत लाईनसाठी 55 कोटी मंजूर झाल...
खा. सुजय विखे पाटील यांची माहिती ः मार्चमध्ये निविदा निघणार
अहमदनगर । नगर सह्याद्री
अहमदनगर शहरात भूमिगत विद्युत लाईनसाठी 55 कोटी मंजूर झाले असल्याची माहीती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
यासंदर्भात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून अहमदनगर शहरासाठी भूमिगत विद्युत लाईन टाकण्यासाठी 55 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. तसेच निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व नगर विकास खात्याचे आभार मानले. नवीन वर्षात या कामाला सुरुवात होणार असून येत्या मार्च महिन्यात भूमिगत विद्युत लाईनसाठी निविदा प्रक्रीया होईल. त्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामाला सुरुवात होणार असल्याचे खा. विखे यांनी सांगितले. शहरात रस्त्याच्या मधोमध असणार्या डीपी व विद्युत खांबांमुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत होता, त्यातून आता शहरवासियांची सुटका होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यानी व्यक्त केला.
लोकप्रिनिधींना आवाहन करताना ते म्हणाले, भूमिगत विद्युत लाईनचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यामुळे शहरात दुरुस्ती होणार्या रस्त्यांचे किंवा नव्याने विकसित होणार्या रस्त्यांचे बांधकाम सहा महिने टिकेल अशा पद्धतीने करावे. यासोबतच अहमदनगर शहर खड्डे व धूळ मुक्त करण्याचा आपला मानस असल्याचेही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
COMMENTS