शिर्डी / नगर सह्याद्री - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून शिर्डीत किमान 5 लाख भाविक...
शिर्डी / नगर सह्याद्री -
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून शिर्डीत किमान 5 लाख भाविक येण्याचा अंदाज संस्थानने वर्तवला आहे. भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी संस्थानने साईबाबांचे मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दर अर्ध्या तासाला 10 हजार भाविकांच्या दर्शनाचे नियोजन करण्यात आले असून 80 हजार भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्त निवासातील 2800 खोल्यांसह शहरातील हॉटेलमधील खोल्यांचेही 80 टक्के ऑनलाइन बुकिंग झाले आहे.
दीड लाख भाविकांना मोफत भोजन मिळणार आहे. प्रसादासाठी 350 क्विंटल मोतीचूर बुंदी लाडूंची पाकिटेही तयार केली आहेत. दर अर्ध्या तासाला सुमारे 10 हजार भाविक याप्रमाणे 31 डिसेंबरच्या सूर्यास्तापासून तर सूर्योदयापर्यंत 2.50 लाख भाविकांच्या दर्शनासाठी यंत्रणेने तयारी पूर्ण केली आहे. मात्र यावेळी रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होणार असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे.
COMMENTS