अहमदनगर । नगर सह्याद्री इंडिया खेलो फुटबॉल अंतर्गत नगरमध्ये प्रथमच नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. अहमदनगर ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
इंडिया खेलो फुटबॉल अंतर्गत नगरमध्ये प्रथमच नमोह फुटबॉल क्लबच्या माध्यमातून निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. अहमदनगर कॉलेज फुटबॉल मैदानावर झालेल्या या स्पर्धेत 17 व 15 वर्षांखालील मुले मुली मिळून 120 पेक्षा अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते. नगरसह हैदराबाद, भुसावळ, पुणे, दौंड, मुंबईतील खेळाडूही नगरला आले होते. यातून अनेक गुणी खेळाडू मिळाले असून भविष्यातही नमोह फुटबॉल क्लब अशा उपक्रमातून चांगले खेळाडू हेरून त्यांना प्रोत्साहन देणार आहे अशी माहिती नमिता फिरोदिया यांनी दिली.
नगरमधील स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंना इंडिया खेलो फुटबॉल प्री फायनल स्पर्धेत तसेच दिल्लीत होणार्या राष्ट्रीय फायनल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. नमोह फुटबॉल क्लब नगरमध्ये फुटबॉलच्या प्रसारासाठी तसेच खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. नमोह फुटबॉल क्लबची इंडिया खेला फुटबॉल उपक्रमासाठी विभागीय पार्टनर म्हणून निवड झाली होती. भारतीय फुटबॉलचा दर्जा वाढविण्यासाठी देशभरातील 24 हून अधिक शहरात निवड चाचणी झाली. यात नगरचा समावेश झाला होता. नगरमधील स्पर्धेत 17 व 15 वर्षाखालील मुलांना तसेच 17 वर्षाखालील मुलींना सहभागी करुन घेण्यात आले होते. नवीन वर्षात नमोह फुटबॉल क्लब अशा अनेक संधी उपलब्ध करून देत खेळाडूंना उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाचा आणि स्पर्धेचा अनुभव मिळवून देईल अशी ग्वाही नमिता फिरोदिया यांनी दिली.
COMMENTS