प्रदेश युवक काँग्रेसकडून अहमदनगर बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर बार असोसिएशनच्या निवडण...
अहमदनगर । नगर सह्याद्री
अहमदनगर बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संजय पाटील, उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ शिर्के, सचिव अॅड. गौरव दांगट, खजिनदार अॅड. सुनील तोडकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते. अहमदनगर बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत हे सर्व पदाधिकारी निवडून आले आहेत.
यावेळी असोसिएशनच्या व वकिल बांधवांच्या समस्या जाणून घेऊन विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना सत्यजीत तांबे यांनी बार असोसिएशनचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन सर्व पदाधिकारी व सदस्यांना दिले. तसेच त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव योगेश काळे, दिपक धाडगे, अनिल धाडगे, शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल कळमकर, सोशल मीडिया अध्यक्ष योगेश दिवाणे, आसाराम पालवे उपस्थित होते. तसेच जिल्हा बार असोसिएशनचे सहसचिव अॅड. अजिंक्य काळे, महिला सहसचिव अॅड. आशा गोंधळे, महिला कार्यकारिणी सदस्य अॅड. प्रिया जगताप, कार्यकारिणी सदस्य अॅड. रोहित कळमकर, अॅड. नितीन खैरे, अॅड. रामेश्वर कराळे, अॅड. विजय पठारे, अॅड. रावसाहेब चौधरी, अॅड. अभिजात पुप्पाल आदी नूतन पदाधिकार्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे सचिव अॅड. गौरव दांगट यांनी आभार मानले.
COMMENTS