मुंबई - अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे....
मुंबई -
अभिनेत्री जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. स्टार किड्सपैकी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चाहत्यांच्या मनात राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर देखील राज्य करते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अशातच आता जान्हवी कपूरच्या नव्या फोटोसची एकच चर्चा होताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस अदांमुळे ती नेहमी चर्चेत राहिली. इन्टाग्रामवर जान्हवी नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. फोटोंसाठी सोशल मीडियावर चाहते प्रतिक्षा करत असतात. अशातच जान्हवी सध्या सुट्टीवर असल्याने तिने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ती फ्लोरोसंट बिकनी घालून समुद्र किनाऱ्यावर मजा करताना दिसत आहे. जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.
त्यामुळे आता इंटरनेटचा पारा वाढलाय, अशी कमेंट नेटकरी करत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर जान्हवी नव्या लूकमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे जान्हवीने 10 - 20 कोटी रुपयांचं नाही तर तब्बल 65 कोटी रुपयांचं Duplex घर खरेदी केलं आहे. जान्हवीने वयाच्या 25 व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचं घर विकत घेतलं आहे.
COMMENTS