वारंवार घडणार्या घटना थोपविण्यात पोलिसांना अपयश अहमदनगर | नगर सह्याद्री एकाच दिवशी चार ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याच्या ...
एकाच दिवशी चार ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सकाळी व सायंकाळी सावेडी उपनगरात तीन तर नालेगाव परिसरात एक घटना घडली. यासंदर्भात तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकालाही हे चोर सापडत नसल्याचे दिसून येत आहे.
रविवारी सकाळी शोभा सुधाकर कल्हापुरे (वय ५० रा. शिवनगर, जुना पिंपळगाव रोड, सावेडी) व त्यांचा मुलगा दुचाकीवरून एकविरा चौकाकडून तपोवन रोडकडे जात असताना साहीब बेकरीसमोर मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने शोभा यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबडून धूम ठोकली. यासंदर्भात कल्हापुरे यांनी रविवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी पुष्पावती पंडितराव ठमके (वय ५९ रा. सोनानगर, सावेडी) त्यांच्या नातवाला घेऊन सोनानगर पार्कपासून पाटील चौकाकडे जात असताना साबळे यांच्या घराजवळ सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण ओरबडले. पुष्पावती यांचा नातू सायकलसह रस्त्यावर पडला. पुष्पावती त्याला उचलण्यासाठी खाली वाकल्या असता चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण ओरबडून पायी पळत सुटला. पुष्पावती यांनी आरडाओरडा केला, परंतु चोरटा पसार झाला. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याच चोरट्यांनी पुढे सायंकाळी ७.२५ च्या सुमारास लक्ष्मी उद्यानजवळ वनिता सुभाष जोशी यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन ओरबाडली. वनिता यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला असता चोरट्याने सोन्याच्या चैनीचा आर्धा भाग तोडून पळ काढला.
COMMENTS