नवी मुंबई / नगर सहयाद्री - स्लॅब कोसळून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
नवी मुंबई / नगर सहयाद्री -
स्लॅब कोसळून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील सगळेजण झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब अंगावर कोसळला. यात दोघे जण जखमी झाले आहे. तर १२ वर्षांच्या मुलावर मात्र काळानं घातला घातलाय.
नवजीवन सोसायटी नावाची एक दोनमजली इमारत आहे.या दुमजली इमारतीचा बहुतांश भाग जीर्ण झाला आहे त्यामुळे शासनाने इमारतीमधील धोका आहे.अशी नागरिकांना आधीच नोटीस पाठवण्यात आली होती.पण नोटिसकडे दुर्लक्ष करुन नागरीक जीव मुठीत धरुन याच ठिकाणी वास्तव्य करत होते.
अशा इमारतींमध्ये राहणं जीवघेणं ठरु शकतं, हे या घटनेनं अधोरेखित केलंय. दरम्यान, नवजीन येथील सोसायटीचा दुसऱ्या आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला आणि एकच खळबळ उडाली.पण १२ वर्षांचा चिमुरडा स्लॅबखाली दबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, अशी अंदाज वर्तवला जातोय. या १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जीर्ण इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी वेळीच दुसऱ्या ठिकाणी राहायला जाण्याची गरज व्यक्त केली जाते आहे.
COMMENTS