पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील वासुंदे येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सारिका सोमवंशी यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस...
पारनेर तालुयातील वासुंदे येथील व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सारिका सोमवंशी यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कतिक महोत्सव समिती व आपला आवाज आपली सखी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न भूतो न भविष्यती असा पुणे व पिंपरी चिंचवडच्या इतिहासात प्रथमच ऐतिहासिक रेकॉर्ड सोहळा झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संगिता तरडे व अतुल परदेशी यांनी दिली आहे.
झाशीची राणीलक्ष्मी यांच्या १८४ व्या जयंतीनिमित्ताने १८४ पुरस्कार्थीचा सन्मान सोहळ्यात आपली पुरस्कार्थी म्हणून निवड झाल्या बददल महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कतिक महोत्सव समिती व आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने पत्राद्वारे कळविले आहे. शनिवार दि. २६ नोव्हेंबर २०२ रोजी आचार्य अत्रे रंग मंदिर, संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड येथे आयोजित केलेल्या सोहळयास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आपल्या कार्यास अधिक बळकटी मिळो यासाठी आपला सन्मान करण्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार नीलेश लंके, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके, गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ. झावरे, पारनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, भागुजी झावरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
COMMENTS