आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद अहमदनगर | नगर सह्याद्री जैनाचार्य राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांच...
आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद
अहमदनगर | नगर सह्याद्रीजैनाचार्य राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांच्या १०९ व्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सध्या सामाजिक जाणिवेतून चार मोफत तपासणी शिबीर घेतली जात आहेत. ही समाज उपयोगी बाब उल्लेखनीय अशीच असून सध्याच्या काळात गरजेची असल्याचे प्रतिपादन नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांनी केले.
आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे स्व.कुसुमबाई वसंतलालजी चोपडा यांच्या स्मरणार्थ वसंतलाल चुनीलाल चोपडा व परिवार आयोजित मोफत अस्थिरोग तपासणी व अत्यल्प दरात उपचार या शिबिराचे तहसीलदार पाटील यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळीआयोजक वसंतलालजी चोपडा तसेच अमोल रोडे, सतीश लोढा, सुनील भंडारी, संतोष बोथरा, डॉ,आशिष भंडारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले कि, सध्या सर्वत्र धकाधकीचे जीवनमान सुरु आहे यामुळे अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. यामुळे विविध आजारही बळावतात.आरोग्यसेवा हि आता महागड्या होत आहेत. यासाठी वेळच्या वेळी आरोग्याच्या तपासण्या होणे हे महत्वाचे असून अश्या मोफत शिबिराच्या माध्यमातून गरजूंनी त्या करून घेतल्या पाहिजेत. जैन सोशल फेडरेशनने हि सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली असून या शिबिरांचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. व कोविड महामारीच्या काळातही आनंद हॉस्पिटलच्या रुग्णसेवा कार्याचे त्यांनी आवर्जून कौतुक केले.एक आदर्शवत असेच कार्य जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून आपण केल्याचे सांगून असेच आपले सेवा कार्य बहरत राहो यासाठी शुभेच्छा दिल्या.
वसंतलाल चोपडा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील रूग्णसेवा संपूर्ण देशात नावाजली जाते. अल्प दरात अथवा गरजूंवर पूर्ण मोफत उपचार केले जातात. संतांचा आशीर्वाद असलेल्या या हॉस्पिटलच्या कार्यात योगदान देणे खूपच आनंददायी असते. भविष्यातही या सेवाकार्यास हातभार लावण्याचा प्रयत्न नक्कीच करू. जैन सोशल फेडरेशनच्या वतीने संतोष बोथरा यांनी सर्वांचे स्वागत करून हॉस्पिटलच्या कार्य विषयी माहिती दिली. अस्थिरोग विभागा विषयी बोलताना ते म्हणाले अस्थिरोग, मणके तसेच सांधेबदल शस्त्रक्रिया, संपुर्ण गुडघा प्रत्यारोपण, संपुर्ण खुबा प्रत्यारोपण इ. शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. सर्व आधुनिक उपकरणांनी सुसज्ज ६ ऑपरेशन थिएटरस येथे कार्यंवित करण्यात आलेले असून ए.सी.एल. रि-कन्स्ट्रशन व ऑर्थोस्कोपी (दूर्बिनिव्दारे शस्त्रक्रिया) निदान महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत मोफत केली जाते. वसंतलाल चोपडा परिवाराचे हॉस्पिटलच्या सेविकार्यात नेहमीच सक्रीय योगदान असते असे बोथरा यांनी सांगितले. या शिबिरात तज्ञ् डॉ. विशाल शिंदे, व डॉ. अमित सुराणा यांनी २१६ अस्थी रोग संबंधित रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. डॉ.आशिष भंडारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
COMMENTS