निघोज / नगर सह्यादी टिपू सुलतान यांनी सर्वधर्मसमभाव संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात देउन एकात्मता निर्माण करण्याचे काम केले असल्या...
निघोज / नगर सह्यादी
टिपू सुलतान यांनी सर्वधर्मसमभाव संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात देउन एकात्मता निर्माण करण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य सेनानी शेर ए हिंदोस्तां हजरत टिपू सुलतान यांची जयंती मा. संदीप वराळ पाटील जनसेवा फाउंडेशनच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतरत्न मौलाना आझाद युथ फाउंडेशनचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लम भाई इनामदार, बार्टी संस्थेचे पदाधिकारी सुलतान भाई सय्यद, जितेंद्र राऊत, मंगेश वराळ, शोएबभाई तांबोळी, मुजफ्फरभाई तांबोळी, जैद तांबोळी, हुसेन इनामदार, मन्सूर मोमीन, गुड्डू इनामदार, फरहान तांबोळी, फौंडेशनचे कार्यालयीन व्यवस्थापक श्रीकांत पवारआदी उपस्थित होते साजिदभाई तांबोळी यांनी त्यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली व अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.
COMMENTS