निघोज | नगर सह्याद्री शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राज्यातील सर्व सामान्य माणसाला मोठा आधार मिळाला असून महाराष्ट्र राज्याचा ख...
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे राज्यातील सर्व सामान्य माणसाला मोठा आधार मिळाला असून महाराष्ट्र राज्याचा खरा विकास शिवसेनेच्या निर्मीतीनंतर झाला असल्याचे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना प्रमुख मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रेरणेने, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या मार्गदर्शनाखाली बाभूळवाडे तालुका पारनेर या ठिकाणी शिवसेना पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे मित्र परिवार आयोजित मोफत नेत्र तपासणी शस्रक्रिया, मोफत चष्मे वाटप आयोजित शिबिराचे उद्घाटन शिवसेना पारनेर तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना पारनेर तालुका संघटक अमोल गजरे, शिवसेना सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ कदम, देवेंद्र जगदाळे, बाळासाहेब नवले, सविता जगदाळे, प्रमोद खनकर, निशिगंधा बोरुडे, निलेश कदम, अभय खिलारी, श्रीराम पवार, मंगेश खनकर, कवडे गुरुजी, माणिक जगदाळे, बि. आर. जगदाळे, वसंत मातेरे, राघू चिकणे, अनंता जगदाळे, अनंता मातेरे, वसंत बांदल, दत्तात्रय क्षिरसागर, मोहन मातेरे, बाबुराव पताडे, आप्पा शिर्के, बाबाजी जगदाळे, दिपक जगदाळे, प्रभाकर पोटे, मंजुळा पवार, शकुंतला खनकर, रेवन खनकर, बाळासाहेब जगदाळे, सचिन जगदाळे, मुरलीधर नवले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर मुंबई येथील मराठी माणसाला खर्या अर्थाने प्रगती करता आली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेत राज्याचा विकास केला. पारनेर तालुयात माजी आमदार विजय औटी यांनी शिवसेना भक्कम करीत पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात खर्या अर्थाने विकास करीत तालुका विकासमय केला. हे सर्व शिवसेनेमुळे शय झाले असून यापुढेही शिवसेनेला मोठे भवितव्य असल्याची ग्वाही डॉ. पठारे यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS