पारनेर महाविदयालयात राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन पारनेर | नगर सह्याद्री प्रत्येक व्यक्ती सामाजीक, शारिरीक आणि मान...
पारनेर महाविदयालयात राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
प्रत्येक व्यक्ती सामाजीक, शारिरीक आणि मानसिकदृष्टया निरोगी असेल तेव्हाच त्याला उत्तम आरोग्य लाभते म्हणुन सुखी समाधानी आयुष्यासाठी आरोग्य हे महत्वाची भूमिका निभावत असते. बळकट शरिर रोगाशी लढण्यास व आरोग्य तंदुरूस्ती प्राप्त करण्यास मदत करत असते असे पंचायत समितीचे माजी सभापती मत माजी राहूल झावरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर महाविदयालयात आरोग्य शिबीराचे आयोजन केले. त्या प्रसंगी शिबीराचे उद्घाटक म्हणून बोलत होते. ते पुढे राहुल झावरे म्हणाले, योग्य आहार, आरोग्य, व्यायाम या सर्व गोष्टीवर प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता अवलंबुन असते व व्यक्ती निरोगी आयुष्य चागंल्या प्रकारे जगु शकतो आरोग्य माणसाला दिर्घ आयुष्यी बनवते. म्हणून पारनेर महाविदयालयाने हा महाविदयालयीन विद्यार्थ्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले. अशा प्रकारच्या शिबीरामधुन महाविदयालयीन विद्यार्थ्यामध्ये असणार्या समस्या काय आहे. त्या या सारख्या शिबिरामधून निष्पन्न होतील आणि त्या अनुषंंगाने आपल्या आरोग्याची काळजी घेता येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी आपली आरोग्य तपासणी तसेच करुण आपल्या आरोग्याचा समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरेल. पारनेर महाविदयालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातुन वर्षभर अनेक उपक्रम राबवले जातात. रक्तदान, हिमोग्लोबीन तपासणी, डोळे तपासणी अशी शिबिरे महाविदयालयीन विदयाद्यार्थ्यांना निश्चीत महत्वाची ठरतील असे मत सभापती राहूल झावरे पाटील यांनी या निमीत्ताने मांडले.
या प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर यानी देखील आपले मनोगत मांडले. ते आपल्या मनोगतात म्हणाले अशा प्रकारची शिबिरे महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निश्चित उपयोगी पडेल असे मत मांडले या आरोग्य शिबिरात ७१ स्वयंसेवकांनी रक्तदान केले. २४३ विदयार्थीनींचे हिमोग्लोबीन तपासणी झाली. १७७ विदयार्थी व विदयार्थिनींची डोळे तपासणी झाली. अनेक प्रकारच्या तपासणी देखील करण्यात आल्या. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, प्रा. संजय कोल्हे, पारनेर ग्रामीण हॉस्पीटल मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाळुंज नगर अर्पन ब्लड बॅक चे व्यवस्थापक डॉ. भाग्यश्री पवार, डॉ. पोटे, डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, प्रा. संजय आहेर, डॉ. अशोक घोरपडे, डॉ. संजय गायकवाड, प्रा. प्रतिक्षा तनपुरे, प्रा. अबासाहेब गंडाळ, राष्ट्रीय सेवा योजना व छात्र सेना छात्र सेना स्वयंसेवक व महाविदयालयातील अनेक विदयार्थी, महाविदयालयीन प्राध्यापक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
COMMENTS