पाडळी रांजणगाव येथे १५ लाखांच्या रस्ता कामास सुरुवात सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पाडळी रांजणगाव येथील जनतेच्या भरभक्कम आशीर्वाद व...
पाडळी रांजणगाव येथे १५ लाखांच्या रस्ता कामास सुरुवात
पारनेर तालुयातील पाडळी रांजणगाव येथील जनतेच्या भरभक्कम आशीर्वाद व पाठबळामुळेच आम्हाला विकासकामे करण्यासाठी प्रेरणा मिळत असल्यामुळे गावासाठी लाखों रुपयांचा निधी आणू शकलो असे मत पाडळी रांजणगावचे सरपंच तथा राष्ट्रवादी चे युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी १५ लक्ष रुपयांच्या रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच वैशाली करंजुले होत्या.
यावेळी सरपंच कळमकर यांनी सांगितले की, तालुयाचे आमदार लंके, जिल्हा परिषद सदस्या राणी लंके व समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांच्या सहकार्याने दलित वस्ती सुधार योजनेतून जाधव वस्ती रस्ता काँक्रीटीकरण दहा लक्ष व जनसुविधा योजनेतून घडगा वस्ती रस्ता काँक्रीटीकरण यासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी मिळाला आहे. विकासकामे कामे करत असतांना जनतेचा पाठींबा महत्वाचा आहे. गावातील विकासकामे प्रगतीपथावर असून कामे दर्जेदार व भक्कम होण्यासाठी ग्रामस्थांनी दक्ष रहावे असे अवाहन यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सेवा सोसायटी चे चेअरमन डी. बी.करंजुले, तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब साठे, व्हा. चेअरमन अप्पासाहेब कळमकर, जेष्ठ नेते विठ्ठल साठे, सुभाष पाटील, भगवान उघडे, संभाजी करंजुले, संजय औटी, संगम साठे, अतुल कळमकर, भगवान करंजुले, भाऊसाहेब उबाळे, अरुण उबाळे, सुभाष मुकिंदा उबाळे, रंगनाथ उबाळे, नारायण उबाळे, एकनाथ उबाळे, सोनबा पाटील, दिगंबर करंजुले, बाबाजी करंजुले, उत्तम करंजुले, विठ्ठल करंजुले, बाळासाहेब करंजुले, कांतीलाल करंजुले, शहाजी करंजुले, वसंत जाधव, हनुमंत जाधव, सुनील जाधव, रमेश जाधव, गोरख जाधव, राजू उबाळे, भाऊसाहेब कळमकर, माणिक जाधव, सुनील उबाळे, अजय उबाळे, विठ्ठल उबाळे, कल्पना उबाळे, साधना उबाळे आदी उपस्थित होते.
COMMENTS