मुंबई । नगर सह्याद्री - संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. य...
मुंबई । नगर सह्याद्री -
संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला आहे. यावर राज्यातील शिंदे सरकार गेले नाही तर महाराष्ट्राचे 5 तुकडे होतील, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले आहे. बेळगाव सीमाप्रश्न अजून सुटलेला नसताना कर्नाटक राज्य आता कोल्हापूरच्या पुढे जाऊन सांगली जिल्ह्यातील तालुक्यावर दावा करत आहे. तरीही शिंदे सरकार गप्प आहे. हे सरकार लवकर गेले नाही तर महाराष्ट्राचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही आहे.
संजय राऊत म्हणाले, कुणाला महाराष्ट्रातून मुंबई तोडायची आहे. कुणाला गाव, जिल्हे तोडायचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरू आहे. तरीदेखील आता आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 50 आमदारांसह गुवाहाटीला जात आहे. ते गुवाहाटीला गेल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राचा काही भाग मागितला नाही म्हणजे मिळवल, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
COMMENTS