गुलमोहर रस्त्याच्या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी अहमदनगर | नगर सह्याद्री शहराचे विस्तारीकरण सुरू झाले त्यानुसार सर्वात प्रथम...
गुलमोहर रस्त्याच्या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी
अहमदनगर | नगर सह्याद्रीशहराचे विस्तारीकरण सुरू झाले त्यानुसार सर्वात प्रथम नागरिक गुलमोहर रोड परिसरात राहण्यासाठी जाऊ लागली आहे. हे शहराचे सर्वात पहिले उपनगर आहे. गुलमोहर रस्ता हा शहरातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचे विकासाचे काम व्हावे यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला असून नियोजनबद्ध व दर्जेदार रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. दहा मीटर रुंद रस्त्याचे काम होणार असून साईट पट्टी व मधोमध स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गुलमोहर रस्ता हा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. नगर शहरातील नागरिकांनी विकास कामांमध्ये सहभाग नोंदवावा व आपल्या सर्वांचे नगर शहर विकसित करण्यासाठी मदत करावी. टप्प्याटप्प्याने शहरातील विकासाचे सर्वच प्रश्न मार्गी लागले जाणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
गुलमोहर रस्त्याच्या विकास कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी मनपा उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक अजिंय बोरकर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रंबके, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उद्योजक अमोल गाडे, सुमित कुलकर्णी, शिरीष जानवे, सुरेश म्हस्के, गिरीश जगताप, जितेंद्र खंडेलवाल, मंगेश सोले, संदीप भापकर, प्रवीण पालवे, हर्षल बांगर, गोकुळ गोधडे, विक्रम वाडेकर, अनुप सात्राळकर, चैतन्य कुलकर्णी, अमित गटने, लक्ष्मीकांत पठारे, अभय खाबिया, प्रशांत दरे, रवींद्र बाकवाल, इंजि.केतन क्षीरसागर, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि. मनोज पारखी, ओंकार देशमुख, भैय्या वाबळे, ठेकेदार मेहर आदी उपस्थित होते.
अजिंय बोरकर म्हणाले की, गुलमोहर रस्ता हा उपनगरातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली होती. आमदार संग्राम जगताप यांनी या रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. या रस्त्याचे काम आता प्रगतीपथावर असून लवकरच हे काम मार्गी लागणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी गुलमोहर रोडला पर्यायी रस्ता म्हणून गंगा उद्यान ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंतचा नविन रस्ता करून दिला आहे असे ते म्हणाले.
COMMENTS