संगमनेर । नगर सह्याद्री संगमनेर शहर शिवसेना तालुका शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे बेताल ...
संगमनेर । नगर सह्याद्री
संगमनेर शहर शिवसेना तालुका शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे बेताल वक्तव्य करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची धोती व टोपी असलेली वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराजांपुढे त्यांना हजार वेळा नत मस्तक करण्यात आले व माफी मागून प्रतीकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला. भगतसिंग कोश्यारी व खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली. यापुढे बेताल वक्तव्य केल्यास तुम्हाला महाराष्ट्रात छत्रपती प्रेमी शिवसैनिक फिरू देणार नाहीत, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला.
यावेळी शिवसेना युवा सेनेतील पदाधिकारी व महिला पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, उपजिल्हा प्रमुख मुजीब शेख, नरेश माळवे, गोविंद नागरे यांची भाषणे झाली व त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. या निषेध प्रसंगी भाऊसाहेब हासे, उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, नागपूर संपर्क प्रमुख नरेश माळवे, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, शिवसेना कार्याध्यक्ष दीपक साळुंके, दीपक वनम, इम्तियाज शेख, फैसल सय्यद, महिला आघाडी सुरेखा गुंजाळ, आशाताई केदारी, संगीता गायकवाड तसेच युवा सेनेचे गोविंद नागरे, सुदर्शन इटप,अक्षय बिलाडे,फरोज कतारी,संकेत खुळे,वैभव अभंग, संभव लोढा, रंगनाथ फटांगरे, एस पी रहाणे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवा सेना विधानसभा प्रमुख राजू सातपुते, अक्षय गाडे, लक्ष्मण सोन्नर, निलेश रहाणे, शिवसेना शाखाप्रमुख अजीज मोमीन, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, कार्यालयीन प्रमुख बंडू म्हाळस, रिक्षा सेनेचे बढे, भगवान पोपळघट, माधव फुलमाळी, शहर समन्वय असिफ तांबोळी, अक्षय गुंजाळ, नारायण पवार, निलेश गुंजाळ, प्रकाश चोथवे, विभाग प्रमुख विजय भागवत, जयदेव यादव, दानिश पारवे, अल्ताफ शेख, प्रतीक मिसाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.
COMMENTS