तुळशी सामुदायिक विवाह उत्साहात निघोज | नगर सह्याद्री निघोज येथील मंळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा हा गावचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणी ध...
तुळशी सामुदायिक विवाह उत्साहात
निघोज | नगर सह्याद्री
निघोज येथील मंळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा हा गावचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणी धार्मिक संस्कृती रुजविण्यासाठी महत्वपूर्ण आहे. मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ वरखडे व त्यांच्या सहकार्यांनी प्रभु श्रीराम भक्त हनुमान यांच्यासमान कार्य केले असल्याचे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुयातील निघोज येथील मंळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने शंभर पेक्षा जास्त तुळशी विवाह संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंडळानी गेली ११ वर्षं हा सामुदायिक तुळशी विवाह संपन्न केला असून दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. या तुळशी विवाहाचे पौराहित्य पोपटराव देशपांडे यांनी केले. यावेळी कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, माजी सभापती सुदाम पवार, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, डि. बी. लाळगे कंट्रशनचे अध्यक्ष दत्तात्रय लाळगे, मंळगंगा सामुदायिक तुळशी विवाह मंडळ अध्यक्ष सोमनाथ वरखडे, मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार व पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम कळमकर, माजी उपसभापती खंडू भुकन, बाळासाहेब लामखडे, शांताराम कळसकर, बबनराव ससाणे, शिवाजीराव वराळ, बाबाजी तनपुरे, मंगेश लाळगे, महेश ढवळे, नामदेवराव थोरात, दत्तात्रय लंके, अनिल लंके, अशोक लंके, निवृत्ती महाराज तनपुरे, सतिष साळवे, अनंतराव वरखडे, हिराभाउ कवाद, अशोकराव लंके, रवि रणसिंग, रोहित दादा पठारे, महेश ठाणगे, भाऊसाहेब लामखडे, उपाध्यक्ष विष्णू लोखंडे, रामराव वरखडे, बाबाजी वाघमारे, प्रकाश वराळ, नारायण पवार, लक्ष्मण शेटे, बाबाजी लंके, शांताराम लाळगे, भगवान लामखडे, माउली वरखडे, कोंडिभाउ लाळगे, मुकुंदराव निघोजकर, प्रशांत लोळगे, संपतराव वरखडे, शिवाजी भुकन, अभिषेक लंके, सुनिल गायखे, सतिष गायखे, संतोष गायखे, शुभम निघोजकर, मंगेश भागवत, कृष्णा वरखडे, अभिषेक लंके, अनिकेत गोरे, तुषार मंदीलकर, प्रथमेश चव्हाण, चैतन्य खराडे, आर्यन गायखे, हरी निघोजकर, सोहम गायखे, उदय भोसले, समाधान वरखडे, राकेश सोनवणे, राजवीर गुंड, शुभम गायकवाड, शिवम गायखे, विशाल जाधव, अथर्व इंगळे, सार्थक लंके, शिवाजी शेटे, सचिन शिरवले, शुभम शेवाळे, आनंद हरिहर, ओंकार रणसिंग, अरविंद नरवडे, तन्मय देशपांडे आदी तसेच मंडळाच्या मार्गदर्शिका सुमन कवाद, शोभाताई वाढवणे, सुभद्राबाई तनपुरे, शालुबाई लाळगे आदी तसेच मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्या राणी लंके म्हणाल्या गेली ११ वर्षं हे मंडळ सामुदायिक तुळशी विवाह आयोजित करुन एक धार्मिक कार्य संपन्न करीत असून अतिशय चांगले काम करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ वरखडे व त्यांच्या सहकार्यांनी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात सामाजिक व धार्मिक योगदान देऊन गाव विकासासाठी पाठबळ दिले आहे. आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून गाव व परिसर त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून गावविकासाचे कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष सोमनाथ वरखडे प्रास्ताविकात म्हणाले, गेली ११ वर्ष राबवलेल्या या सामुदायिक तुळशी विवाह माहिती देऊन पुढील वर्षी तपपूर्ती सोहळा असून सात दिवस किर्तन सोहळा, आठव्या दिवशी तुळशी विवाह, दररोज अन्नदान व महाप्रसाद तसेच नामवंत किर्तनकारांचे किर्तने अशाप्रकारे आयोजन करण्यात येणार असून हजारो तुळशी विवाह या सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्यात संपन्न होणार असल्याची माहिती वरखडे यांनी दिली आहे. मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट,निघोज ग्रुप ग्रामपंचायत, मंळगंगा साईधाम युवा गणेश मंडळ, आपला गणपती गणेश मंडळ, बाळगोपाळ मंळगंगा साईधाम गणेश मंडळ, मंळगंगा सामुदायिक तुळशी मंडळ, पारनेर तालुका पत्रकार संघ आदिंनी सहभागी होत कार्यक्रमाचे नियोजन केले. सायंकाळी सात नंतर संगीत भजनी मंडळ कन्हैया पठारवाडी यांचा संगीत भजणी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. आपले गणपती गणेश मंडळांचे अध्यक्ष रवी रणसिंग, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव ससाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी कृष्णा वरखडे, अभिषेक लंके यांनी आभार मानले.
शेकडो तुळशी विवाह संपन्न
रविवार दि.५ रोजी सायंकाळी सहा ते ९ या तीन तासांत शेकडो तुळशींचा विवाह संपन्न झाला. यावेळी पोपटराव देशपांडे यांनी पौरोहित्य केले व तुळशी विवाहाचे महत्व विशद केले. यावेळी कन्हैया संगीत भजनी मंडळाने भक्तीगीतांचा महिमा गायीला. रामायण गिते गात असताना मळगंगा नगरी व राम नगरी अवतरल्याचा आनंद आल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, सरपंच चित्राताई वराळ पाटील व उपस्थीतांनी व्यक्त करीत मंळगंगा सामुदायिक तुळशी विवाह मंडळ व ग्रामस्थ यांचे कौतुक केले.
COMMENTS