सलग 37 वर्षे 15 टक्के लाभांशाची परंपरा जपल्याचा आनंद : श्रीगोपाल धूत अहमदनगर । नगर सह्याद्री श्रीरामकृष्ण अर्बन सोसायटीच्या सभासदांना प्रा...
सलग 37 वर्षे 15 टक्के लाभांशाची परंपरा जपल्याचा आनंद : श्रीगोपाल धूत
अहमदनगर । नगर सह्याद्री
श्रीरामकृष्ण अर्बन सोसायटीच्या सभासदांना प्रातिनिधीक स्वरुपात आर्थिक वर्ष 2021-22 चा 15 टक्के लाभांश वितरण बुधवारी चेअरमन श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन अशोक बंग, संचालक राजेंद्र गुजराथी, प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत झंवर, किसनलाल बंग, गोपाल मनियार, विश्वनाथ कासट, राजेंद्र मालू, मधुसुदन सारडा, राजेंद्र कंत्रोड, देवराव साठे, मथुराबाई झंवर, अनुरिता झगडे, व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक, कुमार आपटे, अशोक खटोड, डॉ.रवींद्र सोमाणी, चंद्रकांत मुथा, जनकराज आहुजा, रामप्रसाद हेडा, गिरीश अग्रवाल, प्रदीप बार्शीकर, नितीन भंडारी, रमणिक छेडा, अनिल खंडेलवाल, रवींद्र गांधी आदी उपस्थित होते.
धूत म्हणाले, डोंगरे महाराज यांच्या आशीर्वादाने सुरु झालेल्या श्रीरामकृष्ण अर्बन सोसायटीने सलग 37 वर्षे उत्तम आर्थिक कामगिरी करीत सभासदांना 15 टक्के लाभांश दिला आहे. संस्थेची घोडदौड कायम राखण्यात संचालक मंडळ, कर्मचार्यांना यश आले आहे. संस्थेच्या या प्रगतीत सभासदांचाही सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच लाभांश वितरण करताना विशेष आनंद होत आहे.
प्रा. मधुसुदन मुळे म्हणाले , संस्थेला पूज्य डोंगरे महाराजांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे येथील कामकाज अतिशय उत्तमरित्या चालते. 37 वर्षे संस्थेचे पावित्र्य जपत संचालक मंडळ अतिशय चांगले काम करीत आहे. विश्वस्त भावनेने काम होत असल्यानेच संस्थेची आर्थिक प्रगती झाली आहे. सावेडीतील शाखेतूनही अतिशय चांगली सेवा ग्राहकांना मिळते. सभासद रामसुख मंत्री म्हणाले की, 37 वर्षात सातत्याने 15 टक्के लाभांश देण्याचे काम या संस्थेने केले आहे. ठेवींचा ओघही कायम वाढत आहे. त्याचबरोबर आता संस्थेने सोनेतारण कर्ज वाढविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करावेत. सभासदांना कायम आपुलकी व प्रेम संस्थेकडून मिळत असते. संचालक लक्ष्मीकांत झंवर यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती देताना सांगितले की, आर्थिक शिस्त व पारदर्शी कारभार यामुळे प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेवला आहे. सभासदांना दुर्धर आजारासाठी मदत केली जाते. 65 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांनाही सन्मान म्हणून 1000 रुपयांची ठेव पावती व मानपत्र देण्यात येते, असे ते म्हणाले. यावेळी सभासद अतुल खिस्ती, हर्षा गुजराथी, सारिका कासट यांनीही भावना व्यक्त करीत संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. सूत्रसंचालन अनुरिता झगडे यांनी केले. अशोक बंग यांनी आभार मानले.
COMMENTS