मुंबई । नगर सह्याद्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं ंआणि राज्यामध्ये नव्या वादाला तों...
मुंबई । नगर सह्याद्री
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं ंआणि राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. त्यात भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाने आणखी तेल ओतलं गेलं. या विधानांमुळे आता छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले संतापले असून त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी दोघांनाही खडे बोल सुनावले आहे. मी कोश्यारी यांच्या विरोधात नाही. पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हे असंच चालू राहिलं तर ही विकृती निर्माण होईल. यापुढे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याला निस्तनाभूत करण्याचा विचार आम्ही केला आहे. त्याचबरोबर उदयनराजेंनी 28 नोव्हेंबरचा अल्टिमेटमही दिला आहे. पुढची वाटचाल काय असेल ते त्यावेळी आपण जाहीर करू.
COMMENTS