आपलं गांव फाउंडेशनच्या वतीने सत्कार पारनेर | नगर सह्याद्री तालुयातील बाभुळवाडे येथील प्रियंका मच्छिंद्र पावडे हिची राज्य उत्पादन शुल्क अधिक...
आपलं गांव फाउंडेशनच्या वतीने सत्कार
तालुयातील बाभुळवाडे येथील प्रियंका मच्छिंद्र पावडे हिची राज्य उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली. तिने मिळविलेल्या या यशाबददल आपलं गांव फाउंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते या यशाबद्दल सन्मान करून तिचे कौतुक करण्यात आले.
प्राथमिक शिक्षकाची मुलगी असलेल्या प्रियंका हिने लहानपणीपासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकरी विषयातील बी.टेक ची पदवी प्राप्त केल्यानंतर प्रियंका हिने पुणे येथे राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. तिने अभ्यासासाठी घेतलेल्या मेहनतीस यश येउन तिची राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग दोनच्या पदावर निवड झाली. अधिकारी पदावर निवड झाल्याने बाभुळवाडे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत प्रियंका हिचा आपले गांव फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड उदय शेळके तिचे वडील मच्छिंद्र पावडे आई शैला पावडे, भाउ आकाश पावडे यांच्यासह आपलं गांव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर विश्वस्त संतोष बोरूडे, संजय शिर्के, माजी सरपंच बी. आर जगदाळे, अमोल शिर्के, संतोश इंगळे, सुभाष खणकर, राजेंद्र खणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खणकर, निशिगंधा बोरूडे, शितल खणकर आदी यावेळी उपस्थित होते.
सामान्यांच्याप्रश्नांना न्याय देऊ..मुलींनी शिक्षणात मागे न राहता उच्च शिक्षण घेउन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे. सुरूवातीपासून आपण उच्च शिक्षण घेउन अधिकारी पदावर काम करण्याचे ध्येय बाळगले होते. त्यासाठी आई- वडील यांच्यासह कुटूंबातील सर्व सदस्य तसेच आपलं गांव फाउंडेशनचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच मी माझे स्वप्न पुर्ण करू शकले. पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्यास आपण प्राधान्य देऊ अशी प्रतिक्रिया प्रियंका मच्छिंद्र पावडे यांनी दिली आहे.
COMMENTS