निघोज । नगर सह्याद्री बाभूळवाडे गावातील कु.प्रियंका मच्छिंद्र पावडे हिची उत्पादन शुल्क अधिकारी वर्ग 2या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आपलं ग...
निघोज । नगर सह्याद्री
बाभूळवाडे गावातील कु.प्रियंका मच्छिंद्र पावडे हिची उत्पादन शुल्क अधिकारी वर्ग 2या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आपलं गाव फाउंडेशन व ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रियंका हिचे वडील प्राथमिक शिक्षक असून लहानपणापासून तिने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या दृष्टीने तिने आपले शेतकी विषयातील बी टेक. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्य सेवा परीक्षेचा अभ्यास पुणे येथे सुरू केला. तिच्या कष्टाला फळ मिळाले आणि ती अधिकारी झाली. या वेळी तिचे वडील मच्छिंद्र, आई शैला, भाऊ आकाश, आपलं गाव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर, विश्वस्त संतोष बोरुडे, क्षीरसागर संजय शिर्के तसेच माजी सरपंच बी. आर जगदाळे, अमोल शिर्के, संतोष इंगळे, सुभाष खणकर, राजेंद्र खणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खणकर, निशिगंधा बोरुडे, तसेच शीतल खणकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शिक्षणात मुलिंनी मागे न राहता उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे ही आपली शैक्षणिक संकल्पना आणी स्वप्न होते. यासाठी आई वडील कुटुंबातील सर्व सदस्य तसेच आपलं गाव फौंडेशन व ग्रामस्थ यांचे मार्गदर्शन मिळाले. पाठबळ मिळाले म्हणून आपल्याला अधिकारी होता आले. सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहील असे मत प्रियंका पावडे यांनी केले.
COMMENTS