प्रियांकाने आपल्या मुलीच्या चेहऱ्याची एक झलक दाखवली आहे. ज्यामध्ये ती प्रियांकाच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आहे.
नगर सह्याद्री / मुंबई -
अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर अनेकदा शेअर केला आहे पण तिचा चेहरा कधी दिसत नव्हता. कधी मालतीचा चेहरा कपड्याने झाकलेला असायचा तर कधी इमोजीने लपवायचा. पण अलीकडेच प्रियांकाने आपल्या मुलीच्या चेहऱ्याची एक झलक दाखवली आहे. ज्यामध्ये ती प्रियांकाच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आहे. इथेही मालतीचा चेहरा लोकरीच्या टोपीने झाकलेला असला तरी तिचा अर्धा चेहरा दिसत आहे.
प्रियांका चोप्राने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.फोटो शेअर करताना प्रियांकाने पोस्टला कॅप्शन दिले, "मला म्हणायचे आहे..." ज्यानंतर लोक या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
COMMENTS