पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील मेहसाणा येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
नगर सह्याद्री / नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातमधील मेहसाणा येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे, ज्यासाठी व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा देश मोठा, हीच आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीला बरोबर घेऊन आपण काम करतो. दुसरीकडे काँग्रेस हे घराणेशाही, जातीयवाद आणि व्होट बँकेच्या राजकारणाचे मॉडेल आहे. काँग्रेसने गुजरात आणि संपूर्ण देश उद्ध्वस्त केला आहे.
मेहसाणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या २० वर्षात गुजरात खूप बदलला आहे. आजच्या पिढीला गुजरातला कोणत्या कमतरतेचा सामना करावा लागला आहे हेच माहीत नाही. या पिढीची कमतरता दिसली नाही. मागच्या पिढीने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
COMMENTS