नगर-पुणे महामार्गावरील घटना सुपा | नगर सह्याद्री अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे अज्ञात वहानाने धडक दिल्याने पा...
नगर-पुणे महामार्गावरील घटना
अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे अज्ञात वहानाने धडक दिल्याने पादचारी ठार झाला आहे.
सविस्तर असे की, शनिवारी रात्री ११ च्या दरम्यान अहमदनगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण शिवारातील हाँटेल फाऊटन समोर एका पदाचार्याला आज्ञात वहानाने जोराची धडक देऊन जबर जखमी केले आहे. त्याचे वय अंदाजे २७ वर्षे असावे अशी खबर आली असून सुपा पोलिसांनी तात्काळ पेंट्रोलियमवरील गाडी व १०८ रुग्णवाहिका वाडेगव्हाण येथे रवाना केली. तेव्हा तेथे एक जरासा वेडसर भासणारा इसम जबर जखमी अवस्थेत होता. सुपा पोलिसांनी तात्काळ त्या अनोळखी इसमास १०८ रुग्णवाहिकेने अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्या इसमावर उपचार चालू आसतानच रविवार दि. २० नोव्हेंबर रोजी पहाटे दीड वाजता त्याचे निधन झाले अशी माहिती दिली.
सुपा पोलिसांनी सीआरपीसी १७४ नुसार गुन्हा दाखल केला असुन सदर आज्ञात व्यक्ती विषयी कोणाला काही माहिती आसल्यास सुपा पोलिसांसी संपर्क साधावा असे आवाहन सुपा पोलिस यांनी केले आहे. पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पठाण हे पुढील तपास करत आहेत.
COMMENTS