राळेगणसिद्धी-ग्राम परिवर्तन दिन साजरा पारनेर । नगर सह्याद्री प्रत्येक गावात सामाजिक सलोखा व एकोपा वाढवायचा असेल तर अशा प्रकारचे ग्राम पर...
राळेगणसिद्धी-ग्राम परिवर्तन दिन साजरा
पारनेर । नगर सह्याद्री
प्रत्येक गावात सामाजिक सलोखा व एकोपा वाढवायचा असेल तर अशा प्रकारचे ग्राम परिवर्तन दिन राज्यातील प्रत्येक गावात साजरे करणे गरजेचे आहे. यातून समाजात प्रेम आपुलकी व एकोपा वाढून आपला देश एक संघ होण्यास मदत होईल असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
राळेगणसिद्धी येथे स्व. लक्ष्मीबाई हजारे यांच्या पुण्यस्मरणार्थ ग्रामपरीवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रक्तदान नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच वर्षभरात जन्म घेतलेले नवजात बालके वर्षभरात नव्याने गावात आलेल्या नवधू, ग्राममाता व ग्रामपिता, गावातीव विविध गुणवंत अधिकारी कामगार शेतकरी यांचेही या वेळी सत्कार करण्यात आला.
महाजन म्हणाले, राळेगणसिद्धी ने गावाचा वाढदिवस हा ग्राम परिवर्तन दिन म्हणून साजरा करण्याची सुरू केलेली कल्पना खरोखर आभिनंदनीय आहे. ही कल्पना आतापर्यंत कोणालाही सुचली नाही. तसेच या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इतरांचाही सत्कार केला जातो अशा सत्कारातून सत्कार झाल्या नंतर त्या व्यक्तीला मोठी प्रेरणा मिळते. आज ग्राम माता व ग्राम पिता यांचा सत्कार झाला. त्यावेळी माझे मन सुद्धा हेलावून गेले. या सत्काराबरोबरच आई-वडिलांची सेवा करणारा नाना मापारी यांचा केलेला विशेष सत्कार खूपच भावला त्याचा आदर्श इतरही तरूणांनी घ्यावा असेही ते म्हणाले.
राळेगणसिद्धी गाव उभे राहिले त्यासाठी अण्णा हजारे यांनी घेतलेल्या कष्टाची किमंत करता येणार नाही. गावाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील सर्व लोक एकत्रित येतात एकमेकांचे विचारांची देवाण-घेवाण होते. आपला देश एकसंघ राहण्यासाठी जातीपाती व द्वेष भावना नष्ट झाली पाहिजे. मी अल्पसंख्याक समाजात जन्माला आलो तरीसुद्धा सहा वेळा जनतेने मला निवडून दिले. कारण निवडणुका जातीपातीवर वर नव्हे तर कर्तुत्वावर होत असतात व त्या तशाच झाल्या पाहिजेत तरच देश एक संघ होईल.
यावेळी हजारे म्हणाले आज समाजामध्ये दोन व्यक्ती दोन जाती दोन धर्म यांच्यामध्ये द्वेश भावना निर्माण होत आहे. त्यामुळे आपला देश तुटतो की काय अशी शंका मनात येते. तसे झाले तर आपला देश एक संघ रहाणार नाही. देश एकसंघ राहीला नाही. तसे झाले तर स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्यांनी 1857 ते 1947 या कालावधीत ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार आहे. त्यासाठी गाव एक संघ राहण्यासाठी गावात एकोपा टिकविण्यासाठी राज्यभरात ग्राम परिवर्तन दिन साजरा करणे गरजेचे आहे. त्यातून जनतेत एकमेकांमध्ये दृढ नाती तयार होतील जातीपाती नष्ट होऊन एकमेकात प्रेमाचे व आपुलकीचे संबध तयार होतील.
प्रास्ताविक व स्वागत सरपंच लाभेष औटी यांनी केले. यावेळी नेत्र विशारद डॉ. तात्याराव लहाने, सरपंच जयसिंग मापारी डॉ.धनंजय पोटे यांची भाषणे झाली. या प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी अशीष येरेकर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, सुजीत झावरे, विश्वनाथ कोरडे, वंसतराव चेडे, राहुल शिंदे, सुरेश पठारे राहुल खामकर, दत्ता औटी, दादा पठारे, सागर मैड, सुभाष दुधाडे, संजय पठाडे गणेश कावरे अमोल मैड, तुषार पवार आदींसह मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थीत होते.
राज्यभरात एकाच दिवशी दोन ऑक्टोंबर रोजी ग्रामपरीवर्तन दिन साजरा करण्यासाठी आपण प्रयत्न करू. मात्र त्या साठी जनतेचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपसातील द्वेश भावना नाहिशी होऊन देश एकसंघ होण्यास मदत होईल अशी भावना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS