पारनेर । नगर सह्या द्री - शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीनागेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. श्रीनागेश्वराची पिंड आणि पार...
पारनेर । नगर सह्याद्री -
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीनागेश्वर मंदिरात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. श्रीनागेश्वराची पिंड आणि पार्वतीच्या तांदळ्यावरील चांदी, दानपेटील रोख रक्कम अशी एकूण 2 लाख 51 हजार रुपयांची चोरी झाली आहे.
याप्रकरणी पुजारी योगेश शांताराम वाघ (वय 42 वर्षे, रा. नागेश्वर मंदीर, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या काही वर्षांतील श्रीनागेश्वर मंदिरात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे. श्रीनागेश्वर मंदिरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, 16 नोव्हेंबर रोजी साडेनऊच्या सुमारास नागेश्वर मंदिरातील पुजा करुन मी मुख्य दरवाजास कुलूप लावून मंदिर बंद करुन घरी जेवण करण्यासाठी गेलो. साडे दहा वाजता झोपलो. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता नागेश्वर मंदिरात नेहमीप्रमाणे पुजा करण्यासाठी गेलो असता मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. मंदिरात जावून पाहिले असता मंदिराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. मंदिरात जावून पाहिल्यावर महादेवाच्या पिंडी वरील चांदीचे आवरण, पार्वतीच्या पिंडीवरील चांदीचे आवरण 2 लाख 50 हजार रुपये किमतीचे चोरुन नेल्याचे आढळून आले. तसेच दानपेटी फोडून त्यातील 1 हजार रुपये चोरुन नेले. यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागेश्वर मंदिर हे भाविकांचे मोठं श्रद्धास्थान आहे. मोठ्या प्रमाणात देवाच्या दर्शनासाठी लोक इथे येतात. मात्र काही अज्ञात चोरटयांनी या मंदिरातच हात साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. या चोरीचा आता पोलीस शोध घेत आहेत.
COMMENTS