लढा अर्धवट सोडणार नाही ः विश्वनाथ कोरडे पारनेर । नगर सह्याद्री तालुक्यातील जवळा येथील 435 अतिक्रमण धारक कुटुंबियांनी तहसीलदारांकडे मांडल...
लढा अर्धवट सोडणार नाही ः विश्वनाथ कोरडे
पारनेर । नगर सह्याद्री
तालुक्यातील जवळा येथील 435 अतिक्रमण धारक कुटुंबियांनी तहसीलदारांकडे मांडली लेखी बाजू मांडली असुन हा लढा अर्धवट सोडणार नाही अशी माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिले आहे.
शुक्रवारी 18 नोव्हेंबर 2022 रोजी जवळे येथील सर्व अतिक्रमण धारकांच्या वतीने तहसिल प्रशासनाकडे विश्वनाथ कोरडे सदस्य प्रदेश कार्यकारीणी भाजपा महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली सर्व अतिक्रमण धारकांनी नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्या कडे आपले म्हणणे मांडले. यावेळी जवळे गावचे उपसरपंच गोरक्ष पठारे, संदिप सालके, नवनाथ सालके, संपत सालके, काळू साळवे, यांसह अनेक अतिक्रमण धारक उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली जवळाचे अतिक्रमण धारक महसुल मंत्री राधाकृष्ण विखेंच्या दरबारी गेल्या आठवड्यात दाखल होवून आपली कैफियत मांडली आहे. तर दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला जाईल असे आश्वासन महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.
उच्च न्यायालयाच्या शासकीय व गायरान तालुक्यातील जवळे गावातील 435 कुटुंबियांना महसुल विभागाच्या वतीने अतिक्रमण केल्याबद्दल तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी बजावली आहे. त्यामुळे या अतिक्रमण धारकांशी भारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांचे शिष्टमंडळाने महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेतली होती. तर दुसरीकडे जवळा तील हे 435 कुटुंबीय या नोटिसांनी धास्तावले असून यासंबंधी सोमवारी माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी अतिक्रमण धारकांशी सविस्तर चर्चा करून दिलासा दिला. तर दुसरीकडे 18 नोव्हेंबर रोजी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार असल्याचे कोरडे यांनी सांगितले.
COMMENTS