पारनेर | नगर सह्याद्री बदलत्या परिस्थितीत आणि वाढत्या लोकसंख्येत गावातील सध्याचे गावठाण क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे गावकर्यांनी महसूलच्...
पारनेर | नगर सह्याद्री
बदलत्या परिस्थितीत आणि वाढत्या लोकसंख्येत गावातील सध्याचे गावठाण क्षेत्र कमी पडत आहे. त्यामुळे गावकर्यांनी महसूलच्या गट नं. ८८० मध्ये निवास प्रयोजनासाठी अतिक्रमणे केली आणि त्यावर ते अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे महसूल मालकीचा गट नं. ८८० हा ग्रामपंचायतीकडे विस्तारीत गावठाण योजनेत वर्ग करावा अशी मागणी कर्जुले हर्याच्या सरपंच संजीवनी आंधळे व उपसरपंच मिनीनाथ शिर्के यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, अनेक वर्षांपासून गावठाणाच्या लगत असणार्या गट नं. ८८० मध्ये गावकर्यांनी घरे बांधली आहेत. हा गट राज्य सरकारच्या मालकीचा असला तरी गायरान म्हणून तो पडीक आहे. हा गट सध्याच्या गावठाणाला लगत आहे. वाढती लोकसंख्या आणि जागेची निकड लक्षात घेता सदरचा गट गावठाण विस्तारीकरणात ग्रामपंचायतीकडे वर्ग होण्याची गरज असल्याची बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
सदरच्या ८८० गटातील निवासी अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात असून त्या सर्वांना अतिक्रमण पाडण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशान्वये हे सारे झाले असले तरी गावातील एकूणच परिस्थिती विचारात घेता ग्रामपंचातीच्या सध्याच्या गावठाणा लगत हे महसूल मालकीचे क्षेत्र असल्याने ते गावठाण विस्तारीकरण योजनेत ग्रामपंचायतीला देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
COMMENTS