पारनेर / नगर सह्याद्री स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान करणारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध ...
पारनेर / नगर सह्याद्री
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करून त्यांचा अपमान करणारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी पारनेर भारतीय जनता पार्टीचे वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. अनेक वर्ष जेलमध्ये राहिले त्यांच्यावर टीका टिपणी करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसच्या नेत्यांना नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वतीने याचा निषेध व्यक्त करत यावर माफी मागावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांच्यासह भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टी पारनेर तालुक्याच्या वतीने शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या वक्तव्याचा जाहिर निषेध पारनेर शहरातील आंबेडकर चौक येथे भाजपा पारनेर तालुक्याच्या वतीने जोडे मारो आंदोलन करुन जाहिर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या पारनेर तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांच्या नेतृत्वामध्ये राहुल गांधी यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे, युवा अध्यक्ष विश्वास रोहोकले, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब चेडे ,शहराध्यक्ष किरण कोकाटे,माजी सैनिक अध्यक्ष बाळासाहेब नरसाळे इतर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंबेडकर चौक पारनेर येथे उपस्थित होते.
COMMENTS