पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, गौरव वांढेकर यांचा सत्कार निघोज | नगर सह्याद्री ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालये व उच्च महा...
पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, गौरव वांढेकर यांचा सत्कार
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालये व उच्च महाविद्यालये सक्षम व गुणवत्तापूर्ण असल्याने गेली दहा ते पंधरा वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत मोठ्या प्रमाणात यश मिळत असून कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता निघोज येथील गौरव वसंत वांढेकर यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते सहाव्या क्रमाकांने राज्यात उत्तीर्ण झाले हाच ग्रामीण शिक्षणाचा ऐतिहासिक पाया असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुयातील निघोज येथील गौरव वसंत वांढेकर हे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण होऊन त्यांची राज्यकर निरीक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शिवाजीराव वराळ, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ, वडनेरचे माजी सरपंच शिवा पवार, नीलेश घोडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील युवा मंचचे तालुका प्रवक्ते प्रतीक वरखडे, निवृत्ती वरखडे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष रफिकभाई हवलदार, बार्टीचे समतादूत सुलतान सय्यद, प्रमोद वराळ, प्रसाद वराळ, संदेश म्हस्के आदी उपस्थित होते.
बाबर यावेळी म्हणाले शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यास असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातील उच्च पदवी मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध होतात. मात्र ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सुविधा न मिळता जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालये, उच्च महाविद्यालय यामध्ये जे शिकवले जाईल त्यावर विसंबून राहावे लागते. मात्र हे उच्च दर्जाचे शिक्षण आहे. आणी याच शैक्षणिक सुविधेतून ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होतो. हे गेली दहा ते पंधरा वर्षात सिद्ध झाले असून या भागातील शेकडो विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत की विविध स्पर्धा परीक्षा असोत त्यामध्ये उत्तीर्ण होऊन राज्य व केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये उच्च अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हा ग्रामीण भागाचा अभिमान, लौकिक व शैक्षणिक दर्जा उच्चतम असल्याचा परिपाक असल्याचे प्रतिपादन बाबर यांनी व्यक्त केले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी यावेळी गौरव वांढेकर यांचे अभिनंदन करुण कौतुक केले. कोणत्याही प्रकारे शिकवणी न लावता प्राप्त परिस्थितीत गौरव यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण होऊन ग्रामिण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे दाखवून दिले असून एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शैक्षणिक सुविधा प्राप्त नसताना राज्यात सहाव्या क्रमाकांने उत्तीर्ण होतो हे प्रत्यक्ष दाखवून दिले असून गौरव वांढेकर यांनी पारनेर तालुका गुणवंत विद्यार्थ्यांची मातृभुमी असल्याचे सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार वराळ यांनी व्यक्त केले आहे. हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शिवाजीराव वराळ यांनी गौरव वांढेकर यांचे कौतुक करीत प्राप्त परिस्थितीत शिक्षण कसे घ्यायचे याचे अनुकरण गौरव याच्याकडून विद्यार्थ्यांनी घेण्याची गरज असून शहरी पेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवंत असल्याचे वांढेकर यांनी सिद्ध केले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS