न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सर्वसामान्य जनतेला न्याय: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पारनेर | नगर सह्याद्री भारतीय जनता पार्टीचे कार्य...
न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सर्वसामान्य जनतेला न्याय: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पारनेर | नगर सह्याद्रीभारतीय जनता पार्टीचे कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली जवळाचे अतिक्रमण धारक महसुल मंत्री राधाकृष्ण विखेंच्या दरबारी मंगळवारी दाखल होवून आपली कैफियत मांडली आहे. तर दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सर्वसामान्य जनतेला न्याय दिला जाईल असे आश्वासन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.
उच्च न्यायालयाच्या शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाबाबत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुयातील शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे महसूल, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विश्वनाथ कोरड यांच्यासह शिवाजीराव धोंडीबा सालके, माजी चेअरमन नवनाथ सालके, संदीप सालके, संपत सालके, कानिफनाथ पठारे, विशाल पठारे, वाल्मीक पठारे, काळू साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना मंत्री विखे म्हणाले की उच्च न्यायालयाच्या अतिक्रमण काढण्याच्या आदेशामुळे स्वाभाविकच अनेक पिढ्यानपिढ्यांपासून गायरान क्षेत्रांमध्ये बांधलेली जी घरे आहेत, ती नियमित कशी करता येईल याबाबत राज्य सरकार कार्यवाही करत आहे. सदर अतिक्रमणे सरकार काढणार नाही. त्याचबरोबर सदर अतिक्रमणे नियमित करताना न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखावा लागेल. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा लागेल. सामान्य माणसाला विस्थापित करण्याची सरकारची भूमिका नाही. सरकार जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. न्यायालयाच्या निर्णयाने काही लोक विनाकारण राजकारण करत आहे. त्यांना सरकार गेल्याचे दुःख आहे. पारनेर तालुयातील वाळूच्या, खडी क्रेशरच्या सर्व अवैध धंद्यांना चाप लागल्यामुळे काही लोकांची अडचण झाली आहे. यामुळे वैफल्यापोटी काही लोक सरकारवर आरोप करत आहेत. गायरान क्षेत्रातील अतिक्रमणा बाबत झालेल्या निर्णयाची सामान्य माणसाला झळ पोहचणार नाही याबाबत सरकार गंभीर आहे, असे आश्वासन मंत्री विखे यांनी शिष्टमंडळाला दिले.
COMMENTS