सुपा | नगर सह्याद्री अहमदनगर - पुणे महामार्गावरील वाढते अपघात, रस्त्याच्या कडेला झालेले अनाधिकृत बांधकाम यामुळे अपघात वाढले. सार्वजनिक बांध...
अहमदनगर - पुणे महामार्गावरील वाढते अपघात, रस्त्याच्या कडेला झालेले अनाधिकृत बांधकाम यामुळे अपघात वाढले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटर प्रायजेस यांच्यातील मिलीभगतमुळे नगर-पुणे महामार्गावर अपघातात निरपराध नागरिकांना जिव गमवावा लागला आहे. याची दखल न घेतल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना १९ नोव्हेंबरला अहमदनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना काळे झेंडे दाखवणार असल्याचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागास वारंवार पत्रव्यवहार करुनही अपघात रोखण्यासाठी उपाय योजना केल्या जात नाहीत.संबधित कंपनीने तहसीलदार यांच्यासह पोलिस प्रशासनालाही दाद दिली नाही. चेतक एंटर प्रायजेसचे अपूर्ण व निकृष्ठ कामामुळे खड्डे पडले. तोडलेली अनधिकृत डिव्हाडर, खचलेल्या साइड पट्या, गोलई अथवा गावाच्या ठिकाणी दिशा दर्शक फलक नाहीत. १२ वर्षे टोल वसुली करणारी कंपनी सुविधा उपलब्ध करू शकत नाही. महामार्गावर प्रवासावेळी स्वच्छतागृहे नाहीत. या गोष्टीसाठी पत्रव्यवहार करुनही खुलासा नाही. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाची चौकशी करून कारवाई गडकरी यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के यांनी सांगितले.
COMMENTS