निघोज | नगर सह्याद्री अनेक वर्षांपासून निघोज ग्रामस्थ पाणी प्रश्नावरून त्रस्त आहेत. दरम्यान निघोज ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेले स्वच्छ पाण...
निघोज | नगर सह्याद्री
अनेक वर्षांपासून निघोज ग्रामस्थ पाणी प्रश्नावरून त्रस्त आहेत. दरम्यान निघोज ग्रामपंचायत निवडणुकीत दिलेले स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन सचिन पाटील वराळ लवकरच पुर्ण करण्याच्या तयारीत आहेत.
निघोज ग्रामपंचायतवर संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनची सत्ता आल्यास नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांनी दिले होते. गेली सहा महिन्यांपूर्वी निघोज ग्रामपंचायत माध्यमातून स्वच्छ पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करीत अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी चर्चा करीत निघोज व परिसरातील जनतेसाठी स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी प्रस्ताव देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. याबाबत सर्व कागदपत्रे तयार करीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शन घेत याबाबत दिल्ली येथील जिवण प्राधिकरण अधिकार्यांशी संपर्क साधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळण्यासाठी दिल्ली येथील अधिकार्यांनी निघोज येथे भेट देउन पहाणी करुन सविस्तर माहिती घेउन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सुपूर्द केला आहे. यासाठी नगर विकास प्राधिकरण अधिकारी तसेच व अहमदनगर येथील जिवण प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता मुळे यांचे विशेष सहकार्य मिळाले. या योजनेसाठी निघोज ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिरसुले परिसरातील जमीन हस्तांतरित करुन या ठिकाणी स्टोरेज टँक व जलशुद्धीकरण प्रकल्प होणार असून सहा ठिकाणी वाडी वस्तीवर पाण्याच्या टायांचे बांधकाम होणार आहे. यासाठी १९ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच नगर विकास प्राधिकरण मार्फत पाणी वितरण व्यवस्थेसाठी दहा कोटी रुपये खर्च होणार असून अशा प्रकारे ही स्वच्छ पाणीपुरवठा योजना जवळपास ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. निघोज गावची व परिसराची वाडी वस्ती लोकसंख्या वीस हजार पेक्षा जास्त असून जनतेला स्वच्छ पाणीपुरवठा व नियमीत पाणी मिळण्यासाठी या पुढील काळात ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांनी दिलेले आश्वासन पुर्तीबद्दल व या योजनेसाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मार्गदर्शन करीत या योजनेला पाठबळ दिल्याबद्दल तसेच राज्य सरकार, केंद्र सरकारचे अधिकारी व मंत्री यांना धन्यवाद देत निघोज ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
स्वच्छ पाणीपुरवठा योजना ३० कोटी रुपये, घनकचरा प्रकल्प ८५ लाख रुपये अशा प्रकारे या दोन्ही विकास प्रकल्पांना लवकरच सुरूवात होत असून येत्या वर्षभरात ही कामे जलदगतीने व परिपुर्ण होणार आहेत. लवकरच ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करुन दोन वर्षात निघोज व परिसरातील दहा ते पंधरा गावांना फायदा होईल असे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय निघोज या ठिकाणी दोन वर्षात उभे राहणार आहे. हीच वचनपूर्ती विकासाची खरी पायाभरणी आहे. या साठी निघोज ग्रुप ग्रामपंचायत, ग्रामस्थ, यांनी पाठबळ दिले असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांनी दिली आहे.
COMMENTS