मुंबई । नगर सह्याद्री - ठाकरे गटाला आणि पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झाले...
मुंबई । नगर सह्याद्री -
ठाकरे गटाला आणि पालघर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झाले असून महाविकास आघाडीला पायउतार करत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप सत्तेत आले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रकाश निकम यांची अध्यक्ष म्हणून तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. शिंदे गटाला महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे.
शिवसेनेचे 20 पैकी 20 सदस्य बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात दाखल झाल्याने हे सत्तांतर शक्य झाले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडली आहे. पालघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या हाती असली तरी शिवसेनेतील 20 पैकी 20 ही जिल्हा परिषद सदस्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता.
पालघर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 57 असून 29 हा बहुमताचा आकडा आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याने हा आकडा पूर्ण झाला आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - 20
भाजप - 13
राष्ट्रवादी - 13
माकप - 6
बविआ - 5
COMMENTS