मुंबई । नगर सह्याद्री - मनोरंजन क्षेत्रातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ वर्ष...
मुंबई । नगर सह्याद्री -
मनोरंजन क्षेत्रातून एक दु: खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये आजारी होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज (शनिवारी) अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गोखले यांच्या पश्चात पत्नी वृषाली गोखले आणि त्यांच्या दोन मुली असा परिवार आहे.
बुधवारी रात्री गोखले यांचे निधन झाले आहे. अशी बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली होती. मात्र, ही बातमी चुकीची असल्याचं यापूर्वीच त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. विक्रम गोखलेंच्या निधनाचं वृत्त ही अफवा असून ते सध्या व्हेंटीलेटरवर आहेत असे वृषाली यांनी सांगितलं होते. गोखले यांचे निकटवर्तीय राजेश दामले यांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती.
गोखले यांची प्रकृती अद्यापही अत्यावस्थ आहे. खूप कॉम्पलिकेशन्स आहे. त्यांच्याकडून म्हणवा तसा प्रतिसाद मिळत नाहीय. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाहीत. तोपर्यंत पुढे काही सांगू शकत नाहीत. अफवांवर कोणी ही विश्वास ठेऊ नका, डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहे. असं दामले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होते. मात्र, आता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे.
COMMENTS