दिल्ली । नगर सह्याद्री - श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक धक्कदायक माहिती समोर अली आहे. आफताबचे काळे कृत्य समोर आले आहे. ब्लेकमेलिंग आणि...
दिल्ली । नगर सह्याद्री -
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी एक धक्कदायक माहिती समोर अली आहे. आफताबचे काळे कृत्य समोर आले आहे. ब्लेकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला करण्याची भीती श्रद्धाने आफताबविरुद्ध पत्राद्वारे पोलिसांत केली होती. अशी माहिती उघड झाली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. जे घडलं ते रागाच्या भरात...अशी कबुली काल आफताबने कोर्टात दिली आहे. मात्र, श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबने कबूल केले नसल्याचे त्याच्या वकिलांनी नंतर स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, आफताबला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तर, आफताब वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आता याच प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धाने महाराष्ट्र पोलिसांना २३ नोव्हेंबर २०२० रोजी पत्र लिहिले होते. त्यात तिने आफताबविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला होण्याची भीती तिने या पत्रात व्यक्त केली होती.
दिल्लीच्या साकेत कोर्टात आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीशांसमोर हजर केले होते. त्यावेळी मी जे काही केले ते रागाच्या भरात, असे त्याने सांगितले होते. मात्र, आफताबने दिलेला जबाब कोर्टाने रेकॉर्डवर घेतले नसल्याचे त्याच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, आफताबची पॉलिग्राफ चाचणी झाली आहे. त्यानंतर त्याची नार्को चाचणी होणार आहे.
COMMENTS