मुंबई । नगर सह्याद्री - कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती त्यांना...
मुंबई । नगर सह्याद्री -
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती त्यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला आहे. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळातच ईडीने हायकोर्टात धाव घेत जामीन रद्द होण्याची मागणी केली आहे. आज ईडीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
त्यामुळे संजय राऊत यांचा जामीन रद्द होणार? की त्यांना दिलासा मिळणार याकडेच सर्वांच लक्ष लागून आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करावा, संजय राऊत यांच्याविरोधात आमच्याकडे पुरावे आहे. असे ईडीने आपल्या याचिकेत म्हटले आहे. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
पत्राचाळ प्रकल्पातून संजय राऊतांनी पैसे कमावले, असे ईडीने म्हटले आहे. वाधवान बंधूंसोबत संगनमत संजय राऊत यांनी पैसे कमावले आहे. असा या आरोप ईडीने केला आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही ईडीने यात म्हटले आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असाही उल्लेख ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार पत्राचाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला आहे. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.
गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली आहे. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली होती.
COMMENTS