तुळजापूर । नगर सह्याद्री - शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळे सोने अर्पण केले आहे. सरनाईक आपल्या कुटुंबियां...
तुळजापूर । नगर सह्याद्री -
शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला ७५ तोळे सोने अर्पण केले आहे. सरनाईक आपल्या कुटुंबियांसोबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किंमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले.
आपण केलेला नवस पूर्ण झाल्याने दागिने अर्पण केल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ते म्हणाले, तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसेच दोन्ही नातवंडांचे जावळ करायचे होते. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असे म्हटले होते. मध्यंतरी कोरोना काळ आणि काही संकटांमुळे येता आले नव्हते. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेले नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो. देवीकडे मांडलेले गार्हाणे पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुले, सुना आणि नातू यांना घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. पत्नीनेच साकडे घातले असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले होते. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. कोरोनामुळे मंदिरे बंद होती, तसंच इतर संकटं आमच्यावर होती. त्यामुळे येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो, असे सरनाईक म्हणाले.
COMMENTS