मुंबई । नगर सह्याद्री - नोकियाचे मोबाईल म्हटले तर की डोळे झाकून विश्वास ठेवता येईल असा म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ९० च्या दशकातले नोकिया...
मुंबई । नगर सह्याद्री -
नोकियाचे मोबाईल म्हटले तर की डोळे झाकून विश्वास ठेवता येईल असा म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ९० च्या दशकातले नोकियाचे फोन आता २०२२ मध्ये स्मार्ट झाले आहे. नोकियाने आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया सी २१ प्लस असे हा नोकियांचा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ एकोणसाठ रुपयांत मिळू शकतो. तर हा स्मार्टफोन केवळ ५९ कसा आणि कुठून मिळेल यासाठी ही बातमी सविस्तर वाचा.
तर नोकियाचा हा स्मार्टफोन नोकिया कंपनीने ११,९९९ रुपयांच लॉन्च केला होता. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन केवळ ९७९९ रुपयात मिळत आहे. या व्यतिरिक्त फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरही आहे, (Flipkart Offer: Nokia C21 Plus Exchange Offer) त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते. हा फोन खरेदी करण्यासाठी जर फ्लिपकार्टवर एक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरलं तर ४९० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत ९३०९ रुपये इतकी होते.
Nokia C21 Plus वर ९२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. पण ही ९२५० रुपयांची फुल ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एक्सेंज करत असलेल्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. अशाप्रकारे जर तुम्ही संपूर्ण ऑफर मिळवण्यात यशस्वी झालात तर या फोनची किंमत केवळ ५९ रुपये इतकी होते.
COMMENTS