मुंबई । नगर सह्याद्री - सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला आहे. स...
मुंबई । नगर सह्याद्री -
सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूरात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत मोठा राडा झाला आहे. सदावर्तेंवर मराठा आंदोलकांनी काळी शाई फेकली आहे. सोलापूरात ते पत्रकार परिषद घेत होते. यावेळी मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घालत त्यांच्यावर शाईफेक केली आहे. या घटनेचा सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला आहे. अशा शाईफेक हल्ल्यांनी मी घाबरत नाही असे सदावर्ते म्हणाले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. यावेळी ते म्हणाले आहे. संविधान दिनी संविधानाबाबत बोलताना, छत्रपतींबाबत बोलताना अशी शाईफेक करण्यात आली आहे. ही काळी शाई छत्रपतींच्या प्रतिमेवरही पडली आहे. याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे माफी मागणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीसाठी त्यांनी काल उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा त्यांना विरोध झाला होता. आज सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करत त्यांची पत्रकार परिषद उधळवून लावली आहे.
COMMENTS